जळगाव प्रतिनिधी । चोरीच्या उद्देशाने फिरणार्या सराईत गुन्हेगाराला आर.एल. चौफुली येथून मध्यरात्री १२.३० वाजता अटक केली. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनुसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड (वय २३) रा. मच्छीबाजार सुप्रिम कॉलनी असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी सतिष गर्जे हे अतुल वंजारी, गफुर तडवी, साईनाथ मुंढे, नरसिंग पाडवी यांच्यासह रात्रीच्या गस्तीवर होते. गस्तीदरम्यान रात्री साडेबाजार वाजेच्या सुमारास आर. एल. चौफुलीजवळील बंद पडलेल्या कंपनीच्या भिंतीच्या आडोशाला एक इसम चेहरा लपवित संशयास्पद रित्या फिरत होता. गस्तीवर असलेल्या पोलिसांना बघताच तो त्याठिकाणाहून पळून जात असतांना पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले. दरम्यान त्याची विचारपुस केली असता, त्याने आपले नाव सोनूसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड असे सांगितले. दरम्यान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो घरफोडीच्या उद्देशाने फिरत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले.