खामगाव प्रतिनिधी । बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य सचिव धनंजय देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
त्यास ना. अमित देशमूख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यामुळे आता खामगाव शहरात वैद्यकीय महाविद्यालय होण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये याआधीच वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेले आहे. परंतु अद्याप जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय ते काम सुरू झाले नाही. खामगाव शहर हे बुलढाणा मध्यवर्ती ठिकाणी आहे तसेच रेल्वे स्टेशन महामार्ग यांना जोडले गेले आहे तसेच खामगाव शहरालगत मोठ्या प्रमाणावर ई क्लासची जमीन उपलब्ध आहे. खामगाव शहरात जिल्ह्यातील सर्वात मोठी वैद्यकीय औद्योगिक वसाहत असल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षण घेता येईल. या सर्व बाबी लक्षात घेता तसेच महाविद्यालयासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा खामगावात उपलब्ध असल्याने येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची मुंबई येथे भेट घेऊन केली. त्यांनी याबाबतीत योग्य कार्यवाही प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले आहेत.