चाळीसगाव प्रतिनिधी । अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी मुंबई येथे सुरू असलेला आंदोलनाचा आज चौथा दिवस असून येत्या दोन दिवसांत मागणी मान्य झाली नाही तर शेतकरी येथूनच थेट सोलर प्रकल्पासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार असल्याचे इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील बोढरे शिवारातील सोलार कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या कवडीमोल भावाने खरेदी केल्या आहेत. यातील बहुतांश शेतकरी हे अडाणी असल्याने त्याचा फायदा घेऊन कंपनीने शेतकऱ्यांवर अक्षरशः अन्याय केला आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळून आर्थिक मोबदला कंपनीकडून दिला जावा यासाठी गेल्या चार वर्षांपासून शेतकरी बचाव कृती समितीने लढा अविरतपणे सुरूच ठेवला आहेत. मात्र स्वतःच्या हक्कांसाठी झटून न्याय मिळत नसल्याने शेवटी कवटाळून शेतकरी बचाव कृती समितीने मोजक्या शेतकऱ्यांसह मुंबई येथे धरणे आंदोलनाला २१ सप्टेंबर रोजी पासून सुरू केले आहेत. त्याचा आज चौथा दिवस उजाडला आहे. उभ्या पावसात हे आंदोलन सुरू असल्याने चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे बोढरे- शिवापूर शिवारातील शेतकऱ्यांनी येत्या दोन दिवसांत मागणी मान्य झाली नाही तर येथूनच सोलर प्रकल्पासमोर तिव्र स्वरुपाचे अंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांनी याकडे जातीने लक्ष दिल्यास नक्कीच पिडीतांना न्याय मिळवू शकतो असी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तत्पूर्वी सदर आंदोलनाप्रसंगी एस. आय.टी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकरी बचाव कृती समितीचा विजय असो अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आहेत. दरम्यान आंदोलनातील काही जणांची प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने चौथ्या दिवशी आंदोलनात जेष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. काशिनाथ जाधव, अध्यक्ष ॲड. भरत चव्हाण, सचिव भिमराव जाधव आदी उपस्थित होते.