यावल, प्रतिनीधी ।तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या गुरांचा गोठया करिता मिळणाऱ्या लाभार्थ्यांनी गुरांच्या गोठा बांधकामात गैरकारभारामुळे मोठा गोंधळ उडाला होता. यात खरे पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे अनुदानापासून वंचित राहिले असून त्यांनी थेट पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना त्यांचे थकीत अनुद्ना त्वरित मिळावे अशी मागणी केली आहे.
यावल तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या गुरांचा गोठया करिता मिळणाऱ्या लाभार्थ्यांनी गुरांच्या गोठा बांधकामात गैरकारभारामुळे मोठा गोंधळ उडाला होता. याच अनुषंगाने येथील रहीवासी गोठा लार्भार्थी शेख निसार शेख रशीद, सौ. शबाना बी शेख मुख्तार दोघ लाभार्थी आहेत. यांचे म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत सन२०१८ ते २०१९ या आर्थिक वर्षात गुरांचा गोठा बांधकाम मंजूर झालेले आहे. ग्रामपंचायतच्या(म.गां.रा.ग्रा.रो.ह योजना)खात्यात गोठा बांधकामपूर्ण झालेल्या एकूण १२ लाभार्थ्यांचे अनुदान जमा झाले होते. त्यापैकी ९ लाभार्थ्यांची रक्कम ग्रामसेवक देवानंद श्रावण सोनवणे यांनी अदा केली आहे. यामध्ये अनुदान मिळवुन सुद्धा गोठा बांधकाम न केलेले लाभार्थी देखील होते. संबधीतांनी अशा बोगस लाभार्थ्यांकड्डन आर्थिक व्यवहार करून तसेच या दोन लाभार्थीनीं पैसे दिले नाही म्हणून त्यांचा गोठा बांधकाम पूर्ण असतांना सुध्दा त्यांना लाभापासून वंचीत ठेवण्याचा प्रकार समोर आला असून, नियमाप्रमाणे गोठा बांधकाम करणारे या दोन लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम (पेमेंट) दिले गेले नसल्याची तक्रार आहे. या संदर्भात गावातील व माहीती अधिकारचे कार्यकर्ते निवृत्ती धांडे यांनी व काही सामाजसेवी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदचे सिईओ यांच्याकडे बोगस गोठा बांधकामाबाबत चौकशी करणे बद्दल तक्रार दाखल केली .या अनुषंगाने यावल येथील गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी दि. २८ / १०/२०२० रोजी प्रत्यक्षस्थळी जाऊन चौकशी केली. मात्र ही चौकशी निःपक्षपणे झालेली नसल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहेत.
दरम्यान, सात लाभार्थ्यांनी गोठा बांधकाम केलेले नाही. सात पैकी दोन लाभार्थ्यांना गटविकास अधिकारी यांनी साधी नोटीससुध्दा दिली नाही. बाकी राहिलेल्या लाभार्थीना सुध्दा त्यांनी गोठे बांधकामा बाबत नोटीसी दिल्या त्या नोटीसीचा या दोन अर्जदारांना सुध्दा दिल्या होत्या. त्यानी खुलासा पण गटविकास अधिकारी पं.स.यावल यांना दिला होता. गटविकास अधिकारी पं.स. यावल डॉ. निलेश पाटील हे या दोन लाभार्थांनां गोठा बांधकाम अनुदान देणेस टाळाटाळ करीत आहे. त्यांचेकडे वारंवार जाऊन सुध्दा त्यांनी गोठा बांधकाम अनुदान खऱ्या लाभार्थ्यांना दिले नाही. त्यांना लाभार्थ्यांकडुन पैशांची अपेक्षा आहे. शेवटी गटविकास अधिकारी यांनी तांत्रिक अधिकारी (नरेगा) पंचायत समिती यावल यांना तोंडी सुचना देवून दि. 5/8/2021 रोजी गोठा बांधकाम पाहणी करणेसाठी पाठविले. तांत्रिक अधिकारी (नरेगा) पं.स.यावल यांनी गोठा पाहणी केल्यानंतर त्यांच्या अहवालामध्ये शबानाबी शेख मुख्तार शेख निसार शेख रशिद यांनी अंदाज पत्रक प्रमाणे काम केलेले आहे असा अहवाल गटविकास अधिकारी पं.स.यावल यांना दिला. त्यानंतर सुध्दा गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील म्हणतात, “दोन नाही एकच गोठा आहे, मी एकच गोठ्याचे अनुदान देईल” असे त्यांचे म्हणने आहे. तरी या दोन लाभार्थींना ग्रामसेवक देवानंद श्रावण सोनवणे य यावल गटविकास अधिकारी हे हेतूपुरस्कर शासनाचे लाभापासून वंचित ठेवत असल्याने अशा प्रकारे खऱ्या लाभार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रासही देण्यात आहेत, सदर गोठा बांधकाम अनुदान मिळणेका मी निर्णय व्हावा व मौजे हिंगोणे ता. यावल येथील गोठा बांधकाम न करता पेमेंट दिले प्रकरणी शासनाच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या खालील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून यांची चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी या दोन लाभार्थांनीं जिल्हा अधिकारी. यांच्याकडे केली आहे. ज्या लाभार्थ्यांना गोठा बांधकाम न करता पं.स.यावल यांचेकडून अनुदान वितरीत करण्यात आले त्यास जबाबदार खालील अधिकारी धरण्यात यावे. तत्कालिन तांत्रिक अधिकारी (नरेगा) पं. स. यावल ज्यांनी गोठा बांधकाम पूर्ण झालेला नसतांना गोठ्याची मोजमाप नोंद पुस्तिकेत नोंद केली. तत्कालिन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (नरेगा) APO ज्यांनी मोजमाप नोंद पुस्तिकेतील नोंदीची शहानिशा न करता त्यावर स्वाक्षरी केली. तत्कालीन गटविकास अधिकारी पं. स. यावल ज्यांनी सदर गोठ्याची पाहणी न करता TPO व APO यांनी तयार केलेल्या बिलावर स्वाक्षरी केली. तत्कालीन ग्रामसेवक ग्रा. पं. हिंगोणा बिल ग्रामपंचायत (नरेगा)च्या खात्यात जमा झालेनंतर संबधीत लाभार्थ्यांनी गोठा बांधकाम पूर्ण झाले की नाही पाहणी व खातरजमा न करता बील अदा केले आहेत. त्यांचे काय असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो .
गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे डॉ.निलेश पाटील यांनी दि. २८ / १० / २०२० रोजी गोठ्याची चौकशी मध्ये लाभार्थ्यांनी गोठा बांधलेला नसतांना सुध्दा दोन लाभार्थ्यांना साधी नोटीस सुध्दा दिली नाही व आपल्या कर्तव्यात कसुर केले म्हणून त्यांचेवर सुध्दा चौकशी अंती कार्यवाही करणेत यावी. त्याच प्रमाणे वरीष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. गोठा बांधकाम अनुदान अदा करणे बाबत आदेश व्हावे. सदर चौकशी वेळी आम्ही तुम्हाला गोठे बांधकाम प्रत्यक्ष दाखवू असे अर्जदार शेख निसार शेख रशीद शबाना बी शेख.मुख्तार सदर अर्जदार यांना न्याय न मिळाल्यास ते लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच माहीतीसाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांना देखील निवेदन देण्यात आले आहे .