चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या चार वर्षांपासून सोलर पिडीत शेतकरी न्यायासाठी शासनदरबारी झटत आहे. परंतु न्याय मिळत नसल्याने शेवटी कवटाळून मोजक्या शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समिती उद्यापासून (दि.२१) मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.
गौताळा अभयारण्य क्षेत्रातील सोलर फार्मस प्रा. लि. व जेबीएम सोलर म. प्रा. लि या बेकायदा सोलर कंपनीने कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून पिडीत शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीने लढा सुरूच ठेवला आहे. एसआयटी चौकशी लावण्यात येईल म्हणून विविध पक्षांकडून गाजर दाखविले जात आहे. मात्र प्रत्यक्षात चौकशी काही लागली नाही. शेवटी शेतकरी हे कवटाळून मोजक्या अन्यायग्रस्तांना सोबत घेऊन शेतकरी बचाव कृती समिती हे २१ सप्टेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. त्याचबरोबर दोन दिवसांच्या आत शासनाने निर्णय निकाली काढले नाही तर २५ सप्टेंबर पासून पिडीत शेतकरी सोलर प्रकल्पात तिव्र अंदोलन करणार असल्याचे इशारा शेतकरी बचाव कृती समितीने केला आहे. कोरोनाचे सावट पहायला मिळत असल्याने नियमांचे पालन करून हे धरणे आंदोलन करण्यात येईल असे लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलताना शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भिमराव जाधव यांनी सांगितले आहे.