रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात ई-पीक पाहणीसाठी तहसिलदार उषाराणी देवगुणे स्वता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन ई-पीक पेरा नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना अवाहन केले आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी असून त्यांचा पेरा स्वता त्यांनाच ऑनलाइन करायचा असून शासना कडून यासाठी व्यापक पध्दतीन प्रसिद्धि केली जात आहे. माझी शेती माझा 7/12 , मीच भरणार माझा पिकपेरा, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.जमीन / 2018 / प्रक्र 92 ( भाग 1 ) ज .1 अ दिनांक 30 जुलै 2021 च्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतातील पीक पेरा भराण्याकामी “ ई पिक पाहणी ” अॅपचे प्रशिक्षण गावोगावी व व्यापक प्रसिध्दी देऊन शेतकऱ्यांना अॅप दवारे पिक पेरे भरण्याचे प्रशिक्षण तलाठी, मंडळ अधिकारी यांचेमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
तथापि शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अदयाप पावेतो पुर्ण केलेली दिसुन येत नाही. पीक पाहणी भरण्याची दिनांक 15 सप्टेबंर 2021 या दिवसापर्यंत मुदत होती.परंतु शासनामार्फत 30 सप्टेबंर 2021 पर्यत सदरची मुदत वाढविण्यात आलेली आहे. सदर पीक पेरेच्या नोंद न झाल्यास पिक विमा भरडधान्य खरेदी व इतर शासकीय कामांना अडचण निर्माण होऊ शकते . तरी शेतक यांनी आपले शेतीचे पीक पेरे तात्काळ स्वत : नोंदवून घ्यावे असे आवाहान महसुल विभागाकडुन करण्यात येत आहे.