पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील पीएम विमा धारक शेतकऱ्यांनी पीक विमा भरपाई मिळवण्यासाठी आज सकाळी ९ वाजेपासून पारोळा येथील पीक विमा कार्यालयात रांगा लावल्या होत्या. परंतु दुपारी 12 पर्यंत कार्यालय उघडले नाही. यावेळी पारोळा तालुक्यातील उपस्थित शेतकऱ्यांनी पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आणि जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांची भेट घेतली.
यासमयी शेतकऱ्यांनी आपल्या पिक विमा संदर्भातील समस्या दादासाहेबांसमोर मांडल्या. याची दादासाहेबांनी त्वरीत दखल घेत संबंधित कार्यालयाचे प्रतिनिधी अमोल सोनवणे, तहसिलदार अनिल गवांदे, तालुका कृषि अधिकारी वारे यांचेशी संपर्क साधुन कार्यालय त्वरीत सुरू करावे व शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय त्वरीत दुर करण्याचा सुचना केल्या व काही वेळातच कार्यालय उघण्यात आले आणि पिक विमा योजनेचे नुकसान भरपाई मिळणेसाठीचे अर्ज जमा करणेस सुरूवात करण्यात आली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत दादासाहेबांचे आभार मानले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, बाजार समितीचे संचालक मधुकर पाटील, दै.दिव्यमराठीचे प्रतिधीनी विश्वास चौधरी व तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.