Home धर्म-समाज पारोळा येथे शिवसेनेतर्फे पत्रकारांना फर्स्ट एड कीटचे वाटप

पारोळा येथे शिवसेनेतर्फे पत्रकारांना फर्स्ट एड कीटचे वाटप

0
27

पारोळा प्रतिनिधी । शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने पारोळा तालुक्यातील पत्रकारांना कृउबा सभापती अमोल पाटील यांच्याहस्ते फर्स्ट एड कीटचे वाटप करण्यात आले.

विधी मंडळाचे गटनेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याप्रसंगी पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी. पाटील, पत्रकार विश्वास चौधरी, भिका चौधरी, रावसाहेब भोसले, रमेश जैन, योगेश पाटील, विशाल महाजन, संजय पाटील, राकेश शिंदे, निलेश जोशी, प्रसाद पाटील, दिलीप सोनार, प्रकाश पाटील, दिपक भावसार, प्रकाश पाटील, अशोक ललवाणी, विवेक कुलकर्णी, विकास चौधरी आदी उपस्थित होते. यासमयी पत्रकार बांधवांच्या वैद्यकीय मदतीसाठी व सहकार्यासाठी प्राधान्याने सदैव अग्रेसर असुन आपल्या कार्यक्षेत्रातील नागरीकांना वैद्यकीय मदत लागल्यास संपर्क करण्याचे आवाहन पत्रकार बांधवांना केले.


Protected Content

Play sound