डॉ. अनिकेत पाटील मास्टर ऑफ सर्जरी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

जळगाव प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत पाटील यांनी मास्टर ऑफ सर्जरी अर्थात एमएस ही पदवीका विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांचा वैद्यकीय वारसा जपत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत पाटील यांनीही वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केल्यानंतर आता मास्टर ऑफ सर्जरी अर्थात एमएसची पदविका विशेष प्राविण्यासह संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्रीमती गोदावरी पाटील, डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुभाष पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांचेसह गोदावरी परिवारातील सदस्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. डॉ. अनिकेत पाटील यांच्या या यशामुळे गोदावरी फाऊंडेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 

 

Protected Content