Home आरोग्य आज जिल्ह्यात आढळला फक्त एक कोरोना रूग्ण

आज जिल्ह्यात आढळला फक्त एक कोरोना रूग्ण

0
106


 

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा आटोक्यात आली असून काल एकही पेशंट आढळून आला नसतांना आज देखील फक्त एक रूग्ण आढळून आला आहे.

आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने एका रिपोर्टच्या माध्यमातून कोरोनाचे अपडेट दिले आहेत. यात गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात एक नवीन कोरोना रूग्ण आढळून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सुध्दा एका दिवशी एकही रूग्ण आढळून आला नव्हता. यानंतर काल सुध्दा एकही रूग्ण आढळून आला नव्हता. तर आज एक पेशंट आढळून आला आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये दोनन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात आता कोरोनाच्या लसीकरणाला देखील वेग आल्याचे दिसून येत आहे. तर जिल्ह्यात सध्या २० सक्रीय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


Protected Content

Play sound