Home Cities चाळीसगाव चाळीसगावात ‘खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेची’ नियोजन बैठक संपन्न

चाळीसगावात ‘खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेची’ नियोजन बैठक संपन्न

0
43


चाळीसगाव, प्रतिनिधी ।  १४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्ताने  ‘खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद -२०२१’ चे २६ सप्टेंबर रोजी चाळीसगावात आयोजन करण्यात आले आहे.  या परिषदेच्या नियोजनाची बैठक आज शासकीय विश्राम गृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे पत्रक प्रसिध्द करण्यात आले. 

 

या नियोजन बैठकीला खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद अध्यक्ष  नानासाहेब भीमराव खलाणे  व  कार्याध्यक्ष लेखक प्रा. गौतम निकम यांनी  ‘ खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद -२०२१’ चे पत्रक प्रसिध्द केले. त्याप्रसंगी स्वागत समिती सदस्य भगवान रोकडे, कैलास जाधव, सुरेश झाल्टे, अप्पा महाजन, प्रशांत महाजन सर, सुरेंद्र महाजन, देविदास महाजन, चेतन महाजन, मुकेश नेतकर व अरविंद खैरनार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound