Home Cities जामनेर शेंदूर्णीत संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

शेंदूर्णीत संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

0
39

शेंदूर्णी प्रतिनिधी ।  येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात  संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

 

शनिवार दि. ४ सप्टेंबर रोजी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या  प्रतिमेचे पूजन समाज बांधवांनी केले. त्यानंतर हभप संजय पवार महाराज देवपिंप्रीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदूर्णी नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्ष विजया खलसे होत्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भय्यासाहेब ऍड. रविंद्र पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजयराव गरुड यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार नाभिक समाज बांधवांनी केला. कार्यक्रमात शेंदूर्णी नाभिक युवक मंडळ कार्यकर्ते व समाज बांधव आणि महिलांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound