Home Cities जळगाव जळगावात संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

जळगावात संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

0
149

जळगाव प्रतिनिधी | श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शहरातील जळगाव जिल्हा नाभिक संघात श्री संत सेना महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन पूजन करण्यात आले.

आज संत श्री सेना महाराज पुण्यतिथी सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. या अनुषंगाने काल सायंकाळी शिवाजीनगर भागातील जिल्हा नाभिक संघात संत सेना महारांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर आज सकाळी पुण्यतिथीच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गुलाबराव देवकर, महापौर सौ. जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नाभिक समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल उखा वाघ, उपाध्यक्ष वामन वाघ, सचिव जगन्नाथ वखारे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound