रावेर प्रतिनिधी | रावेर पंचायत समितीच्या शेष फंडात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. तसेच २० टक्के व १० टक्के वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या चौकशीसाठी निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वात पंचायत समितीत निर्दशने करण्यात आले.
दरम्यान निळे निशान सामाजिक संघटनेन केलेल्या आंदोलना सत्ताधारी भाजपा विरोधात घोषणा दिल्या तसेच येत्या १० सप्टेबर पर्यंत चौकशी करून अहवाल द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गाढे बाळु तायडे बाळु निकम सुधीर सैगंमीरे नारायण सवर्णे छगन सवर्णे विजय धनगर महेश तायडे सदाशिव निकम आदी निळे निशान सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांचा निर्दशनात सहभाग होता.