यावल, अय्युब पटेल । तालुक्यातील डांभूर्णी येथे आ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी रस्ता रुंदीकरण, रस्ता कॉक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन यांच्या हस्ते करण्यात आले.
डांभूर्णी येथे आमदार आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने पहूर, जळगाव, इंदौर, किनगाव, लंगडा आंबा रस्ता रा.मा. ४२ कि.मी. ५३/४०० ते ५९/०० (भाग विदगाव ते डांभूर्णी) ची रुंदीकारणासह सुधारणा करणे अंदाजित रक्कम रु. २८०.०० लक्ष व पहूर, जळगाव, किनगाव, लंगडा आंबा रस्ता रा.मा. ४२ वरील डांभूर्णी गावातील लांबी कॉक्रीटीकरण करणे अंदाजित रक्कम रु. ५६.०० लक्ष असे एकूण ३३६.०० लक्ष रुपयांचे मंजूर अशा विविध विकासकामांचे भुमिपूजन सोहळा आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व माजी आ. प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी जळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख व शिवसेना लोकसभा सह संपर्क प्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, जिल्हा महानगर प्रमुख शरद तायडे, उपजिल्हा प्रमुख रवि सोनवणे, माणिक महाजन, युवासेने तालुका प्रमुख गोटूभाऊ सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सोळुंके, शिवाजी पाटील, उपतालुका प्रमुख योगेश पाटील, उपतालुका संघटक विनायक पाटील, एल. व्ही. पाटील, सुधाकर पाटील, शरद कोळी, गिरडगाव सरपंच मधुकर पाटील, डाभुर्णी सरपंच लताताई कोळी, पिंप्री सरपंच मोहन कोळी, सुरेखाताई कोळी, मुरलीधर पाटील, आण्णा कोळी, बाळू पाटील, संजय कोळी, जितू कोळी, सुनिल फालक, योगेश कोळी, भैय्या धनगर, निलेश सोळुंके, दिनेश सोळुंके, पंढरीनाथ कोळी, सुनील साठे, भारसिंग पावरा, रोहिदास महाजन, श्रावण कोळी, श्रीराम महाराज, राजेंद्र पाटील, बाळू पाटील, निलेश पाटील, भरत चौधरी, दीपक कोळी, मनोहर भालेराव, आशिष झुरळकर, पराग महाजन, गोकुळ कोळी, विनायक सोनवणे, समाधान सोनवणे, प्रल्हाद कोळी, राजेंद्र कोळी, गोकुळ साळुंके, अशोक पाटील, हेमंत पाटील, सूर्यभान पाटील, प्रकाश कोळी, पंकज पाटील यांच्यासह ग्रामस्थ मंडळीची प्रमुख उपस्थिती होती.
https://www.facebook.com/508992935887325/videos/555128125531022