रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात २०१६ पासुन ते आतापर्यंत ६२७ विविध योजनेतील घरकुले अपूर्ण आहे. घरकुलांसाठी मुबलक निधी उपलब्ध असतांना देखिल घरकुले पूर्ण करण्यात विलंब होत आहे.
रावेर तालुक्यासाठी २०१६ पासुन ४ हजार ३४८ घरकुले मंजूर आहे. त्यापैकी ३ हजार ७४१ घरकुले विविध योजनेचे पूर्ण झाले असून ६२७ घरकुले अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यात ढिलाई होत आहे. याकडे गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी लक्ष घालण्याची गरज असून अपूर्ण घरकुलांमध्ये २०१६ चे घरकुले देखिल आहे.
घरकुलांची अशी आहे स्थिती
रावेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी आहे.या लाभार्थांचे २०१६ पासुन मंजूर असलेले ४ हजार ३४८ घरकुले मंजूर होते. त्यापैकी ३ हजार ७४१ घरकुले मंजूर असून ६२७ घरकुले अद्याप अपूर्णस्थितीत आहेत. विशेष म्हणजे यात २०१६ पासुनचे घरकुले असल्याने पूर्ण करण्यात पंचायत समिती कडून ढिलाई होताना दिसत आहे.
लाभार्थांना ग्रामसेवकांकडून नोटीस देणार
२०१६ पासुन विविध योजनेत प्रलंबित असणाऱ्या घरकुल लाभार्थांना ग्राम सेवकां कडून नोटीसा दिल्या जातील व लवकरच पेंडीग घरकुले पूर्ण केले जाणार असल्याचे गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी सांगितले.