यावल येथील जशने ए-पेहरन शरीफ उत्सव साध्या पद्धतीने साजरा

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ओढवलेल्या महामारीच्या प्रादुर्भाव लक्षात घेता सुमारे शंभर वर्षाची धार्मिक परंपरा असलेल्या मुस्लीम बांधवांची जशने ए-पेहरन शरीफ डोली उत्सवाची शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीचा संपुर्ण कार्यक्रम रद्द केल्याचे डांगपूर समितीने घोषित केले आहे.

शहरातील नजमोद्यीन अमीरोद्यीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे  पेहरन आणले  होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र)असे म्हणतात स्वातंत्रपुर्व काळा पासुन यावल येथे या पवित्र वस्त्राची सजविलेल्या डोलीतून शहरातून वाद्यवृंदाच्या गजरात धार्मीक गीत (नातेपाक) म्हणत मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती. दरवर्षी उर्दु वर्षानुसार मोहरम महिन्याच्या १४ तारखेस हा उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवाहत सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे  पेहरन अर्थात तब्बरूक (पवित्र वस्त्र) असलेल्या डोली चे दर्शनघेण्या करीता राज्यासह गुजरात , मध्य प्रदेशसह परराज्यातील सर्वधर्मिक बांधव येथे येतात त्यामुळे संपूर्ण शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. उत्सवात सर्वधर्मिय बांधव मोठया संख्येने सहभागी होत असल्याने उत्सवात हिन्दु मुस्तीम एकत्र येत असतात त्यामुळे  एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणूकी दरम्यान पेहरन-ए-शरीफच्या डोलीखालून निघतांना भाविक मन्नत (मागणे) मागतात. भाविकाने मागीतलेले मागणे हमखास पुर्ण होते अशी हिंदु-मुस्लीम सर्व धर्मिय बांधवांची भाविकांची श्रध्दा आहे. मात्र, गेल्या वर्षा पासुन कोरोनाचे संकट आल्याने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हा उत्सव रद्द करण्यात आला व यंदा देखील पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांनी यंदाची उत्सव समिती डांगपुराचे सदस्यासोबत बैठक घेतली व यात हा उत्सव यंदा देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पारंपारीक पध्दतीने सायंकाळी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडला जाईल या ठिकाणी कुणीचं दर्शन घेण्या करीता येवु नये असे अवाहन उत्सव समिती डांगपुरा अध्यक्ष शेख असलम शेख मुन्सी, उपाध्यक्ष शेख मुशीर शेख बशीर, खजिनदार शेख रशीद शेख बशीर, सचिव शकील खान कुरेशी, शेख अलताफ, शेख रशीद मन्यार, शेख रईस, शेख इमरान सह आदींनी केले आहे.

 

Protected Content