Home Cities चोपडा डॉ. पाटील यांच्या प्रचार पत्रकावर अरुणभाई गुजराथी यांचा फोटो नसल्याने कार्यकर्ते...

डॉ. पाटील यांच्या प्रचार पत्रकावर अरुणभाई गुजराथी यांचा फोटो नसल्याने कार्यकर्ते नाराज

0
36

WhatsApp Image 2019 04 12 at 6.46.51 PM

चोपडा ( प्रतिनिधी )  लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धामधूम सुरू झालेली असतांना  कॉंग्रेस आघाडीत रावेर लोकसभा मतदार संघात नाराजी नाट्य सुरु झाले आहे.  काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचार पत्रकावर माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा फोटो नसल्याने कार्यकर्ते मोठया प्रमाणावर नाराज दिसत आहेत.  आज शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता भवानी मंदिर चोपडापासून मेन रोडवर रॅली निघाली होती. यावेळी वाटण्यात येणाऱ्या पत्रकावर अरुणभाई गुजराथी यांचा फोटो नसल्याने कार्यकर्ते दुखवले गेले आहेत.

 

चोपडा कर्मभूमी असणाऱ्या अरुणभाई यांना पत्रकात स्थान न दिल्याने  कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नाराज दिसले.  पिपल्स बँक कर्मचारी आणि गुजराथी परिवार ही नाराज दिसले.  ह्या पत्रकावर जिल्हाअध्यक्षाचे फोटो आहेत मात्र राष्ट्रवादीचे प्रथम दहा नेत्यांपैकी अरुणभाई असल्यावरही फोटो टाकण्याचे कसे विसरले ?  नेमका फोटो का कापले ?  फोटो कोणी कापले ? ज्यांचे फोटो आहेत त्यांना भाईची आठवण कशी आली नाही ?  या सर्व विषयांची चर्चा चोपडा शहरात सुरू आहे.  तरी याबाबत चोपडा शहरातील दुसऱ्या फळीचे नेत्यांना कार्यकर्ते जाब विचारात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना कठीण झाले आहे. परंतु, याबाबत अरुणभाई गुजराथी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांची मी स्वतः समजूत काढेन. कार्यकर्त्यांचे माझ्यावरचे प्रेम आहे. परंतु, त्यांनी नाराज होऊ नये. आपण सर्व मिळून एकदिलाने काम करू आणि मोठ्या मताधिक्याने डॉ. उल्हास पाटील यांना निवडून देऊ असे आवाहन अरुणभाई गुजराथी यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound