जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर पसिरातील ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शिवाजीनगर खडकेचाळ भागात मंगल प्रताप पाटील (वय-४५) हे परिवारासह वास्तव्यास होते. शहरातील हॉटेल मोरोक्को स्टॉपवर खासगी वाहन चालवून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटूंबीयांनी आरडा ओरड केल्यावर शेजार्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याचे राजेंद्र परदेशी व बशीर तडवी हे कर्मचारी घटनास्थळ रवाना झाले. तसेच पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयत मंगल पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा शुभम, विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.