जळगाव, प्रतिनिधी । भारताच्या ७५ स्वातंत्र दिनानिमित्त भाजपा जळगाव जिल्हा व महानगरतर्फे भाजपा कार्यालय वसंत स्मृति येथे रविवार १५ ऑगस्ट रोजी जिल्हा अध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते सकाळी ८:१५ ध्वजवंदन व भारत माता पुजन करण्यात येणार आहे.
भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथील ध्वजवंदन व भारत माता पूजन कार्यक्रमाला जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी अध्यक्ष, नगरसेवक, शक्ति केन्द्र, बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी ,सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशीं, नितीन इंगळे, वि. स. भा. श्रेत्र प्रमुख दिपक सारखे, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे यांनी केले आहे.