Home Cities चोपडा चोपडा नगरपालिकेच्या स्मशानभूमिचे उद्या लोकार्पण

चोपडा नगरपालिकेच्या स्मशानभूमिचे उद्या लोकार्पण

0
41


चोपडा प्रतिनिधी | येथील नगरपालिकेने उभारलेल्या नवीन स्मशानभूमिचे उद्या सायंकाळी लोकार्पण करण्यात येणार आहे.

चोपडा नगरपालिकेने शहरातील रामपुरा भागात ५ कोटी ६८ लाख रुपये खर्च करुन भव्य स्मशानभूमीची वास्तू उभारली आहे. या स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा १५ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता आयोजित केला असून जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या हस्ते या स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे नेते घनश्याम अग्रवाल, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे असे आवाहन नगराध्यक्षा मनीषा चौधरी, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, गटनेते जीवन चौधरी, उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound