विद्यापीठासमोर अपघातात पो.नि. अनिल बडगुजर बालबाल बचावले

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई विद्यापीठासमोर कारला मागून ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर बालबाल बचावले आहे. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नसून वाहनाचे नुकसान झाल्याची घटना काल सोमवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता घडली.

सविस्तर माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर हे मालेगाव न्यायालयात साक्ष देण्यासाठी कामाच्या निमित्ताने जाण्यासाठी काल सोमवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० सुमारास जळगावहून त्यांच्या खासगी कार (एमएच १८ एजे ३६१८) ने निघाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा समोरून जात होते. त्यावेळी त्यांच्या समोरून ट्रक येत होता. त्याच्या मागून अनोळखी दुचाकीधारक ओव्हरटेक करून ट्रकच्या पुढे येत होता. यावेळी ट्रकचालकाने दुचाकीधारकाला वाचविण्याच्या नादात त्यांचा ट्रक पलटी झाला. तर दुचाकीधारक थेट पुढे निघून गेला. आपघात झाल्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लागलीच कारचा ब्रेक मारला. त्याचवेळी कारच्या मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर हे सुदैवाने थोडक्यात बचावले असून त्‍यांना मुका मार बसला आहे. पो.नि. बडगुजर यांच्या कारचे नुकसान झाले आहे. 

Protected Content