Home आरोग्य भुसावळ आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयास आरोग्य साहित्य भेट

भुसावळ आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयास आरोग्य साहित्य भेट

0
46

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असतांनाच तिसरी लाट येण्याची शक्यता असून चिंताजनक आहे. तिसऱ्या लाटेचं गांभिर्य लक्षात घेवून आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे, यासाठी भुसावळ येथील आ. संजय सावकारे यांनी स्थानिक आमदार निधीतून तालुक्यातील वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला आज आरोग्य साहित्य भेट दिले.

कोरोनाची येणारी तिसरीला पाहता हॉस्पिटल्स सज्ज असावेत म्हणून स्थानिक आमदार निधीतून आमदार संजय सावकारे यांनी वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आज आरोग्य साहित्य भेट दिली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर क्षितीजा हेंडवे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर नी. तू. पाटील हे देखील उपस्थित होते. 

 


Protected Content

Play sound