Home आरोग्य खिरोदा येथे उद्या मोफत हेल्मेट व पुरस्कार वितरण सोहळा

खिरोदा येथे उद्या मोफत हेल्मेट व पुरस्कार वितरण सोहळा

0
34

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । जनता शिक्षण मंडळ सभागृह खिरोदा ता. रावेर येथे उद्या (दि. ७) रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा पत्रकारांसाठी मोफत हेल्मेट व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पुरस्कारांमध्ये पत्रकारांना दोन जीवनगौरव पुरस्कार व दोन मूकनायक पुरस्कार देण्यात येणार आहे. इतरही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, पुरस्कार वितरण महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि ना.गुलाबराव पाटील पालकमंत्री यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे खासदार रक्षाताई खडसे, शिरीष चौधरी आमदार रावेर, चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर, रंजनाताई पाटील जि. प. अध्यक्ष जळगाव, अनिता येवले नगराध्यक्ष सावदा, देवयानी महाजन नगरपालिका उपनगराध्यक्ष यावल,प्रवीण सपकाळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार संघ, किशोर रायसाकडा खानदेश विभागीय अध्यक्ष, सुरेखा पाटील जि प सदस्य ,प्रदीप गायके ग्रामीण जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ ,डिगंबर महाले उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पत्रकार संघ, हे असणार आहेत. तरी सर्व पत्रकारांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका रावेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound