जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी मिळण्याबाबत निवेदन

यावल प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्य शासनाने या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशा मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दारासिंग पावरा यांच्या नेतृत्वाखाली आज तहसिलदार आर.के. पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. 

येथील तहसील कार्यालयात आज (दि.३ ऑगस्ट) जळगाव/धुळे/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर नायब आणी यावलचे तहसिलदार आर के पवार यांना  दि 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींच्या सन्मानाचा,अस्तित्वाचा आणि आदिवासी संस्कृती टिकविण्याचा हा दिन संपूर्ण विश्वामध्ये संयुक्त राष्ट्र संघाने(uno)ने जाहीर केल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव हा दिवस आपल्या संस्कृतीत पंरपरेनुसार मोठया उत्साहाने साजरा करतात त्यामुळे दि 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्य शासनाने या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी जेणेकरून आदिवासी बांधवांना या दिवशी हा सण साजरा करण्यात येईल या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे  युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दारासिंग पावरा यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली त्याप्रसंगी चोपडा ग्रामीण तालुका अध्यक्ष नामसिंग पावरा, युवा चोपडा तालुका अध्यक्ष विनेश पावरा उपाध्यक्ष सचिन पावरा सामाजिक कार्यकर्ते शिवा पावरा आदी उपस्थित होते. तरी राज्य शासना पर्यंत प्रशासनाने आम्ही आदीवासी बांधवांच्या भावना पहोचाव्यात अशी अपेक्षा कृत मागणी करण्यात आली आहे.

 

Protected Content