Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ४ संक्रमित रूग्ण आढळले !

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ४ संक्रमित रूग्ण आढळले !

0
38

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात चार संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर ४  बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात चाळीसगाव व अमळनेर वगळता इतर सर्व तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. 

 

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात अमळनेर तालुक्यातून १  तर चाळीसगाव तालुक्यातून ३  बाधित रूग्ण असे एकुण ४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात एकुण ४  रूग्ण कोरोना आजारातून बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६०५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ९५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७७ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound