पाचोरा प्रतिनिधी । शहरातील कृष्णापुरी, श्रीराम नगरातील नगरपालिका हद्दीतील जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक मंजुर करावे, अशी मागणी लहुजी संघर्ष सेनेतर्फे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदनव्दारे करण्यात आली आहे.
शहरातील कृष्णापुरी, श्रीराम नगरात मागासवर्गीय अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती या जातीचे लोक जास्त प्रमाणात आहे. सदरहु भागात सरकारी पडीत गुरचणीकडे वर्ग असलेली नगरपालिका हद्दीतील अतिक्रमीत जागा असुन सदर खुली जागा ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाने स्मारक व सभागृह मंजुर होणेसाठी येथील लहुजी संघर्ष सेना ही सन – २०१५ पासुन पाठपुरावा करत आहे. याच संदर्भात आज (दि. २८ जुलै) येथील लहुजी संघर्ष सेनेने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील व मुकुंद बिल्दीकर उपस्थित होते. निवेदन देते प्रसंगी लहुजी संघर्ष सेनेचे जेष्ठ नेते मधुकर अहिरे, जिल्हा अध्यक्ष नाना भालेराव, उत्तर महाराष्ट्र सचिव सुकदेव आव्हाड, सरचिटणीस जिभाऊ सोनवणे, तालुका अध्यक्ष पांडुरंग अवघडे, जिल्हा कार्याध्यक्ष ईश्वर अहिरे, जिल्हा कार्य सचिव नाना कोतकर, शहर अध्यक्ष गोपाल अहिरे, समाधान बोराडे, गोलु चांगरे उपस्थित होते.