Home राजकीय रावेर येथे भाजपा व रिपाइंचे जि.प.सदस्याच्या समर्थनार्थ निवेदन

रावेर येथे भाजपा व रिपाइंचे जि.प.सदस्याच्या समर्थनार्थ निवेदन


रावेर प्रतिनिधी । जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन यांच्या मागण्याच्या समर्थनार्थ आज भाजपा व रिपाइंतर्फे निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणाला सामाजिक रंग देऊ नये उलट या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी असे देखील निवेदनात नमूद केले आहे.

दलित वस्तीच्या कामांच्या चौकशी व ई-टेंडरचा मुद्दा योग्य आहे.यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय जनता पार्टी तर्फे तहसील कार्यालय व पंचायत समितीला समर्थनार्थ निवेदन दिले आहे.यामध्ये या चौकशीच्या प्रकरणाला सामाजिक रंग देऊ नका या सर्व प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी सुरु असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

रिपाइंचे निवेदन

रिपाइंतर्फे देण्यात आलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष विक्की तायडे, तालुका सचिव कमलाकर गाढे, सहसचिव भीमराव तायडे, सतीष निकम, इकबाल शेख, राजेंद्र वाघ, सूरज मोरे, हीरालाल मोरे, शेख रफीक, हीरालाल सोनवणे आदीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

भाजपातर्फे निवेदन

भाजपातर्फे देण्यात आलेल्या निवेदनावर भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पंचायत समिती सभापती कविता कोळी, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, श्रीकांत महाजन, संदीप सावळे, हरलाल कोळी, अरुण शिंदे, युवराज चौधरी आदी भाजपा आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound