भडगाव : प्रतिनिधी । आ. किशोर पाटील यांनी ‘आमदार आपल्या गावी’ या उपक्रमांतर्गत काल वडजी गावाला भेट देत गावातील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या.
ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार तरूणांसाठी व्यायामशाळा व अभ्यासिका उभारण्यासाठी तत्काळ निधी देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. या गावाच्या विकासासाठी कटीबध्द असून लवकरच महाराजस्व अभियाअंतर्गत ग्रामस्थांना गावातच सर्व प्रकारचे दाखले देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगतीले.
‘आमदार आपल्या गावी’ या उपक्रमांतर्गत वडजी गावात ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार सुधाकर पाटील यांनी प्रस्तावना केली. गावातील कोरोना काळातील परीस्थीती, लसीकरण, घरकुलांचे सुरू असलेले काम , विविध विकास कामांचा आढावा सादर केला.
आ. किशोर पाटील पाटील पुढे म्हणाले की, वडजी गावाच्या विकासासाठी निधि कमी पडु देणार नाही. जुने भडगाव व वडजी ते रोकडा फार्म, महीदंळे रस्याना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून काम करू असे आश्वासन दिले. तरूणांचा स्पर्धा परीक्षाकडे ओढ पाहता ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या व्यायमशाळा व अभ्यासिकासाठी तत्काळ निधि उपलध्द करून देऊ. चौकात शाॅपिंग कॉम्प्लेक्सवर सभा मंडपाचीही मागणी पुर्ण करण्याचे वचन त्यांनी दिले. ग्राम सचिवालय, रस्ता काॅक्रीटीकरण, शेत रस्ते, पाणी पुरवठा योजना आदि कांमाना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगतीले. यावेळी अनेकांनी समस्या माडल्या.
यावेळी उपसरपंच सुरेखा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदारांनी त्याचां सत्कार केला. डाॅ.विशाल पाटील, संजय पाटील, बाजार समीतीचे प्रशासक युवराज पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डाॅ. विलास पाटील, सरपंच मनिषा गायकवाड, पंचायत समीती सदस्य रामकृष्ण पाटील, विकास सोसायटीचे माजी चेअरमन निंबा पाटील, प्रविण ब्राम्हणे (पाचोरा), ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, स्वदेश पाटील, कैलास पाटील, भाऊसाहेब परदेशी, योगेश मोरे, पुनम सोनवणे, किशोर मोरे, संभाजी मोरे, महेमुद पटेल, शिवशक्ती भिमशक्तीचे तालुकाप्रमुख राजेंद्र मोरे, रणधीर पाटील, भाईदास पाटील, फकीरा पाटील, नाना परदेशी, रविंद्र पाटिल, जीतु पाटील, मगन पाटील, रोहीदास पाटील, माधवराव पाटील, दत्तु पाटील, वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रतिक भोसले, विस्तार अधिकारी टी.पी.मोरे, ग्रामसेवक ए.एम.राठोड, घरकुलचे हर्षल पाटील, आरोग्य सेवक हरीष महाजन, कृषी सहाय्यक राठोड, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.पाटील, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील, पोलिस पाटील कैलास मोरे आदि उपस्थीत होते.
दरम्यान राज्य मार्ग २५ लगत दुतर्फा आंब्याच्या झाडाची आमदारांच्या हस्ते लागवड करण्यात आली . प्रभाग क्रमांक २ मधे १५ व्या वित्त आयोगातुन रस्ता काॅक्रीटीकरण कामाचे भुमीपूजन करण्यात आले. वडजी गावात कोरोनाला अटकाव करण्यासाठी २१६० एवढ्या विक्रमी चाचण्या करणारे डाॅ.प्रतिक भोसले व आरोग्य सेवक डाॅ. हरीश महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
स्तनदा मातांना महीला बाल विकास प्रकल्प विभागाच्या वतीने बेबी कीट वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले तर ग्रामसेवक ए. एम. राठोड यांनी आभार मानले.
आढावा बैठकीत लोकांच्या समस्या ऐकून घेतांना नाना परदेशी यांनी दुध संघाच्या पशुधन विकास कार्डचा पशुपालकाना उपयोग होत नसल्याची तक्रार केली. यावर आमदार किशोर पाटलांनी तेथूनच संघाच्या ‘एमडी’ ना काॅल करून शेतकर्याला त्याबाबत सांगीतले. वीज समस्येबाबतही त्यांनी उपअभियंत्यांना सुचना केल्या. वडजी गावाने उपकेंद्राला जागा दिली आहे. त्यामुळे येथे विजेची समस्या येता कामा नये. गावासाठी दोन ट्रान्संफॉर्मरही मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.