भुसावळ : प्रतिनिधी । नगरपरिषदेच्या लेखा परीक्षक ॲड. श्रीमती तृप्ती भामरे- पिंगळे ह्यांची कन्या श्वेता किरणकुमार पिंगळे हिने आयसीएसई बोर्डच्या दहावी परीक्षेत 95.4 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
श्वेता होरायझन अकॅडमी , नाशिकची विद्यार्थिनी आहे संगणक विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून ती बोर्डात व शाळेत संगणक विषयात प्रथम आली आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.