पाचोऱ्यात कारगील विजय दिवस उत्साहात

पाचोरा प्रतिनिधी । येथील स्व. राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये आज (दि.२६) कारगील विजय दिवसानिमित्त कारगील युध्दात शहीद झालेल्या शुरवीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली असून माजी सैनिकांचा सत्कार  करण्यात आला.

सन – १९९९ मध्ये कारगील येथे पाकिस्तान विरुद्ध युद्ध झाले होते. यात भारताच्या शुरविर सैनिकांनी विजय मिळवत कारगील मध्ये तिरंगा फडकविला होता. या दिवसाची आठवण म्हणून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतिहास संकलंन समिती, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिवस व कारगील युध्दात शहीद झालेल्या शुरवीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात रा. स्व. संघाचे तालुका संघचालक दिनेश अग्रवाल, जवान फाऊंडेशनचे सल्लागार इंद्रसिंग पाटील, उपाध्यक्ष उत्तमसिंग निकुंभ, इतिहास संकलन समितीचे प्रदेश संघटनमंत्री रविंद्र पाटील, भरत महाराज (श्रीराम मंदिर, पाचोरा) व्यासपीठावर होते. याप्रसंगी इंद्रसिंग पाटील, उत्तमसिंग निकुंभ, रमेश पाटील, माधव पाटील, भागवत पाटील, धनराज बोरसे, दिलीप पाटील, राजेंद्र बोरसे, मानसिंग महाले, बापु महाजन, भास्कर शहाणे, रविंद्र पाटील (पिचर्डेकर), रविंद्र पाटील, सुनिल पाटील, रमेश अहिरराव या माजी सैनिकांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कारगील युद्धावर माहिती दिली. यावेळी देवेंद्र बैरागी यांनी पद्य म्हटले. प्रास्ताविक विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री महावीर गौड, सुत्रसंचलन किरण कुंभार यांनी तर उपस्थितांचे आभार महावीर गौड यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. बजरंग दलाचे सहसंयोजक अतुल पाटील, बालाजी वस्ती प्रमुख अमित शर्मा सह पदाधिकारी यांनी आयोजन यशस्वी केले.

 

Protected Content