पाचोरा (प्रतिनिधी ) जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेना या पदाधिकाऱ्यांनी मतभेद विसरून कामाला लागावे व महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना प्रचंड मतांनी विजय मिळवून द्यावा असे आमदार किशोर पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन केले. ते शिवसेना, भाजपाचे लोकसभा उमेदवार प्रचार मेळाव्या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.
उद्या शिवसेना भाजपातर्फे प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी एक वाजता निर्मल कार्यकर्त्यांचा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चंदू पटेल, आमदार राजूमामा भोळे , आमदार गुरुमुख जगवाणी व भाजप जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील हे होते. या वेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, मा सभापती दिनकर देवरे, तालुकाप्रमुख शरद पाटील, मुकुंद बिल्डींकर, नगरसेवक दादाभाऊ चौधरी, शितल सोमवंशी, बंडू चौधरी उपस्थिती होते.