जळगाव, प्रतिनिधी । शासनाने खंडित पडलेली वारी पुन्हा सुरु करण्याचे आदेश देवून नजर कैद असलेले कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांची मुक्तता करण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदतर्फे आकाशवाणी चौकातील दत्त मंदिर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत टाळ मृदुंगाच्या नादात वारी काढण्यात आली.
वारीच्या अग्रभागी विठ्ठल रुक्मिणीच्या वेषातील बालक सहभागी झाले होते. या वारीत सहभागी यांनी भजन गात, पाच पावली खेळत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी सांगितले की, दिड वर्षांपासून कोरोना वैश्विक महामारी आहे. मागील वर्षी शासनाने वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांना विनंती केली असता मानाच्या नऊ-दहा दिंडी यांना परवानगी दिली होती. महाराष्ट्रात यावर्षी दिंडी शक्य होती, जर शासनाने मार्च मध्ये २० वर्षापुढील व ५० वर्षातील वारकरी यांचे प्राधान्याने लसीकरण केले असते तर त्यांना दुसरा डोस जून मिळाला असता व वारकऱ्यांना पायी वारी करत आली असती. बंडातात्या यांनी प्रशासनाच्या निर्देशानुसार दिंडी काढली मात्र त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्यांची २० तारखेला सुटका होणार आहे. परंतु, आगामी आषाढीनंतर मंदिरे खुले केली नाहीत, वारीस परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात पायी वारीला ७५० वर्षाची परंपरा असून यावर्षी तुकाराम महाराजांचा ३६० वा पालखी सोहळा आहे. यात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, तुकाराम या मनाच्या १० पालख्या सोबत साधारण ३५० ते ४०० पालख्या पंढरपुरात दाखल होतात, म्हणून या प्रत्येक पालखीचं किमान ३ ते ४ लोकांना वारी करू द्यावी यासह इतर मागण्या करण्यात आली. या वारकरी संप्रदायाची दिंडी सत्याग्रहात हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, योगेश महाराज जळगावकर, शाम महाराज विदगावकर, संदीप महाराज जळगावकर, रविराज महाराज,एकनाथ महाराज, मंगल महाराज, मयूर महाराज, दिपक महाराज, हिराभाई मुंदडा, गौरव महाराज, नितीन महाराज, चंद्रशेखर महाराज, विश्व हिंदू परिषद जिल्हामंत्री देवेंद्र भावसार, श्रीराम बारी आदी सहभागी झाले होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/2226954540779885