गुजरातमध्ये अल्पेश ठाकोरने सोडला कॉंग्रेसचा साथ

478073202 congress mla alpesh thakor along with 4 mlas may join bjp

अहमदाबाद (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यानं काँग्रेसचा ‘हात’ सोडला आहे. त्याचा जवळचा सहकारी धवल झाला याने ही माहिती आज पत्रकारांना दिली.

 

ओबीसी नेता अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा महिनाभरापूर्वी सुरू झाली होती. मात्र, आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याचं सांगून त्यानं या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. ठाकोर समाजाच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील. तसंच मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं त्यानं स्पष्ट केलं होतं.

गुजरातमधील राधनपूर विधानसभा मतदारसंघातून अल्पेश ठाकोर निवडून आला आहे. तो काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर त्यानं काँग्रेसचा ‘हात’ सोडला आहे. अल्पेशला लोकसभेची उमेदवारी हवी होती. त्यावरून पक्षनेतृत्वावर त्याची नाराजी होती, असं सूत्रांकडून समजले आहे.

Add Comment

Protected Content