अनंतनागमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

श्रीनगर : वृत्तसंस्था । काश्मीर घाटीतील अनंतनाग येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे.

 

हे तिघेही ‘लष्कर ए तोयबा’संघटनचे स्थानिक दहशतवादी होते, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ही दिली.

 

भारतीय लष्कराची १९-आरआर(राष्ट्रीय रायफल्स) सीआरपीएफ आणि एसओजीच्या संयुक्त पथकाने ही कारावाई यशस्वी केली आहे.

 

 

जवानांना रानीपोरा भागात दहशतवाद्यांच्या हालाचालीची माहिती मिळाली होती. ज्या आधारावर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच या भागात दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर बेछूट गोळीबार सुरू करण्यात आला, प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. या कारवाईनंतर देखील परिसरात शोध मोहीम सुरू आहे. संपूर्ण परिसरास जवानांनी वेढा दिलेला आहे.

 

Protected Content