भुसावळ प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर रस्त्याला गटारीचे काम सुरू आहे. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हॉटेल पालखीजवळून भुसावळकडून वरणगावकडे रस्त्याचे बस जातांना गटारीचे ठेकेदार व बसचालकामध्ये किरकोळ कारणावरून मोठा वाद होवून दांगडो निर्माण झाला होता. यावेळी दोघांमध्ये एकमेकांमध्ये अश्लिल शिवीगाळ करण्यात आली होती.
भररस्त्यावर हातापाई होत असल्यामुळे रोडच्या दोन्ही बाजूला वाहतूकीची कोंडी झाली होती. रस्त्यावर एवढा मोठा राडा सुरू असताना देखील पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. जर या ठेकेदार व बसचालकाच्या हमरीतुमरीमुळे एखादी अनुचित प्रकारची घटना घडली असती तर या प्रकाराला जबाबदार कोण असते अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये केली जात होती.
सर्व्हिस रोडच्या बाजुला मोठ्या गटारीचे आर.सी.सीचे बांधकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने दररोज किरकोळ वाद होत आहे. यातुन एखाद्या वेळी काही अनुचित घटना घडु शकते हे नाकारता येऊ शकणार नाही . त्यामुळे पोलिसांनी अशा घटना कडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला आवश्यक त्या सुचना दिल्या पाहिजे असे नागरीकांचे म्हणणे आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/957247128400412