कोरोनाची निर्मिती नैसर्गिकच

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना विषाणूचा उगम चीनमधील प्रयोगशाळेत असल्याचे कुठलेही वैज्ञानिक पुरावे नसून या विषाणूचे मूळ हे निसर्गातच आहे, असे वैज्ञानिकांनी लॅन्सेट नियतकालिकातील शोध निबंधात म्हटले आहे.

 

सोमवारी प्रकाशित करण्यात आलेला हा शोधनिबंध जैववैज्ञानिक, परिसंस्थाशास्त्रज्ञ, साथरोगतज्ञ, प्राणिशास्त्रज्ञ, डॉक्टर्स, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ यांचा समावेश असलेल्या चमूने हा शोधनिबंध लिहिला आहे.

 

शोधनिबंधात म्हटले आहे की, आम्ही नवीन, विश्वासार्ह व वैज्ञानिक माहितीत तपासणी झालेले निष्कर्ष तपासले असून त्यात हा विषाणू नैसर्गिक असल्याचेच स्पष्ट झाले आहे. हा विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडलेला नाही. कारण त्याला कुठलेही वैज्ञानिक पुरावे मिळालेले नाहीत किंबहुना जे पुरावे दिले जात आहेत ते तपासाअंती टिकणारे नाहीत. हा विषाणू प्रयोगशाळेतून सुटला हा केवळ एक कट सिद्धांतच आहे, असे दी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहेत.

 

शोध निबंधात म्हटले आहे, की नवीन विषाणू कुठेही तयार होऊ शकतात. त्यामुळे कोरोनाचा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला याला अजून कुठले पुरावे नसताना तसे म्हणता येणार नाही. बोस्टन विद्यापीठ, मेरीलँड विद्यापीठ, ग्लासगो विद्यापीठ, दी वेलकम ट्रस्ट, क्वीन्सलँड विद्यापीठ यांचा या संशोधनात सहभाग होता.

 

Protected Content