जळगाव प्रतिनिधी । दुचाकीला लाथ मारल्याचा जाब विचारल्या कारणावरून दुचाकीस्वाराला दोन जणांनी तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना काल मंगळवारी ६ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. याप्रकरणी आज बुधवारी सकाळी ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल राठोड आणि चामु साळुंखे रा. कासमवाडी असे दोन्ही संशयित आरोपींचे नावे आहे. अद्याप दोघांना अटक करण्यात आलेली नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,न योगराज चंदन मलके (वय-२४) रा. साईप्रसाद कॉलनी रामेश्वर कॉलनी हा तरूण (एमएच १९ बीआर ८८९८) ने मंगळवारी ६ जुलै रोजी दुपारी सोडतीन वाजता जात असतांना रामेश्वर कॉलनीतील कासमवाडी येथील चौकात अनिल राठोड आणि चामु साळुंखे यांनी योगराज यांची दुचाकी आडविली. दोघांनी दुचाकीला लाथ मारली. दुचाकीला लाथ का मारली याचा जाब विचारला असता अनिल राठोड याने तिक्ष्ण हत्याराने डाव्या गालावर वार करून जखमी केले तर चामु साळुंखे याने शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोहकॉ संजय भोई करीत आहे.