भुसावळ, प्रतिनिधी । आमदार संजय गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करून अटक करा अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यातील चितोडा गावी दोन कुटुंबातील वाद हा पूर्णपणे वैयक्तिक असताना बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्या गावी जाऊन आमदार लोकप्रतिनिधी या नात्याने शांततेचे आवाहन करून तो वाद मिटवले अपेक्षित होता. मात्र या उलट आमदार संजय गायकवाड यांनी चिथावणीखोर वक्तव्य करून एका समाजाच्या भावना दुखावल्या. म्हणून या आमदारावर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी करत समाजविघातक व समाजात द्वेष निर्माण करणारे बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदाराच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन यावल रोड येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिवेश इखारे, शहराध्यक्ष गणेश जाधव, बालाजी पठारे, देवदत्त मकासरे, गणेश इंगळे, बंटी सोनवणे, कुणाल सुरडकर, स्वप्नील सोनवणे, विद्यासागर खरात, शुभम मेश्राम, महेंद्र महेंद्र जोहरे आदी उपस्थित होते.