जळगाव प्रतिनिधी । माहेरहून पन्नास हजार रूपये आणावे नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी देवून जामोद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्यांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जामोद येथील माहेर असलेल्या विवाहिता वैशाली प्रविण कचवे (वय-२०) रा. नरव्हळा ता.जि. धुळे यांचा विवाह १९ मे २०२० रोजी धुळे जिल्ह्यातील नरव्हळा येथील प्रविण हिरामण कचवे यांच्याशी रितीरिवाजानूसार झाले. लग्नानंतर एक महिन्यानंतर सासरच्यांनी चांगली वागवणूक दिली. त्यानंतर पती प्रविण कचवे याने माहेरहून पन्नास हजार रूपये आणावे यासाठी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. परंतू आई वडीलांची परिस्थीत हालाकीची असल्याचे सांगितल्यानंतर पती प्रविण याने मारहाण करण्यास सुरूवात केली. यासाठी सासरे हिरामण रामलाल कचवे, सासू मिराबाई हिरामण कचवे, दीर शरद हिरामण कचवे सर्व रा.नरव्हळा ता. धुळे आणि नणंद अनिता जिवन भामरे रा. चौबारी ता. अमळनेर यांनी गांजपाट केला. माहेरहून पैसे आणल्या शिवाय नांदायला येवू नको नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.