पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील सामनेर जवळच असलेल्या लासगाव सब स्टेशन येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कर्मचाऱ्यांनी कोरोना संक्रमण काळामध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल भारतीय मजदूर संघ व महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, जळगाव यांच्याकडून कमलेश चौधरी यांच्या हस्ते वीज वितरण कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला आहे.
लासगाव ता. पाचोरा सब स्टेशन मधील कनिष्ठ अभियंता दिपक बानबाकोडे, लाईनमन निलेश पाटील, सतिश शिंदे, अखिल मेवाती मोहन सुरवाडे, वासुदेव पाटील, उज्वल पाटील, दिपक पाटील, संदिप पाटील, दिपक सोनवणे, रविंद्र महाजन, सागर पाटील, संदीप मराठे, प्रदीप पाटील, माधव पाटील, इम्रान पठाण व राहुल महाजन या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणुन सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.