जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बर्यापैकी आटोक्यात आल्यामुळे प्रशासनाने पूर्ण वेळ व्यवसाय करण्याची मागणी द्यावी अशी मागणी व्यापार्यांची संघटना कॅटने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.
व्यापार्यांची संघटना कॅटने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले आहे. यात नमूद केले आहे की, प्रशासनाने डेल्टाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहे. गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यात केवळ दोनदाच १० पेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात डेल्टासाठी लावलेले निर्बंध मागे घेऊन पूर्वीप्रमाणे सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत व्यापार करण्यास परवानगी द्यावी.
यात पुढे म्हटले आहे की, जळगाव शहराची लोकसंख्या साडेपाच ते सहा लाख असून त्यातून गेल्या १५ दिवसात दिवसाला १ किंवा २ रुग्णच समोर येत आहे. हे प्रमाण अंत्यत कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यानिवेदनावर कॅटचे वरीष्ठ राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रविण पगारिया, जिल्हा अध्यक्ष संजय शाह, रामजी सूर्यवंशी, सुभाष कासट, शंकर ललवाणी आदींच्या स्वाक्षर्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या मागणीवर विचार करून पूर्ण वेळ व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.