यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथे तरूणाचा कटर मशीनवर काम करतांना पाय कापले गेल्याने त्यास जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले होते उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले
. सोपान शंकर मिस्त्रि (वय ३४ , रा – किनगाव) हा तरूण आज किनगाव येथे सकाळी या मशीनवर काम करीत होता त्याचा पाय कटर मशीनीत कापला गेला त्यास सर्वप्रथम किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉ .मनिषा महाजन यांनी प्रथमोपचार करून त्याच्या पायातुन मोठया प्रमाणार रक्तस्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय विद्यालयात पाठविण्यात आले काही वेळापुर्वीच वैद्यकीय अधिकारी यांनी तो मृत पावल्याचे जाहीर केले आहे .
सोपान मिस्त्रि किनगाव येथे चौधरी वाडयात राहत होता कुशल कारागीर व चांगल्या स्वभावामुळे तो गावात सर्वांना परिचित होता , आई वडील यांच्या निधनानंतर तो एकटाच राहात होता, त्यांच्या कुटुंबात एक मोठा भाऊ असुन तो वेगळा राहातो सोपान यास तिन बहीणी आहेत . त्याच्या अकाली मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .