जळगाव प्रतिनिधी । शेती वाटपाच्या कारणावरून प्रौढाला त्यांच्या दोन्ही भावांसह पुतण्या व भावजई यांनी धारदार शस्त्राने मारहाण केल्याची घटना विटनेर येथे घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील विटनेर येथे विजय भावसिंग परदेशी हे पत्नी शिलाबाई व मुलांसह वास्तव्यास आहे. त्यांचे शेती हिस्से वाटपावरून भाऊ संजय, राजेंद्र तसेच पुतण्या रामधन व भावजाई अलका परदेशी यांच्याशी वाद सुरू आहे. १ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चौघे जण घरी विजय यांच्या घरासमोर येवून शिवीगाळ करू लागले.
शिवीगाळ का करीत आहे, याचा जाब विजय परदेशी यांनी विचारला असता, चौघांनी त्यांना काठीने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत होवून रक्तस्त्राव होवू लागला, भांडण सोडविण्याठी आलेल्या पत्नी शिलाबाई परदेशी यांना देखील लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत विजय परेदशी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दखल झाले. प्राथमोपचार करून विजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही भाऊ, भावजाई तसेच पुतण्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बळीराम सपकाळे करीत आहे.