रावेर प्रतिनिधी । रावेर पुरवठा विभागाच्या कथित प्रकरणाची चौकशी येत्या पंधरा दिवसात पूर्ण होणार असून याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे देणार असल्याचे प्रांतधिकारी तथा चौकशी अधिकारी कैलास कडलक यांनी सांगितले.
शासकीय अर्जात परस्पर बदल करणे,अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे,राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड ३ रुपये प्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे या कारणा वरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तात्कालीन पुरवठा निरिक्षकांची बदली केली होती आता पर्यंत या प्रकरणात रावेर तालुक्यातील सुमारे १४८ रेशन दुकानदारांचे जबाब मंडळ अधिका-यांन मार्फत घेण्यात आले आहे. रावेर तालुक्यात सर्वाधिक चर्चेत जाणारे रेशन प्रकरण आहे. तसेच या प्रकरणात अजुन कोणी कर्तव्यात कसूर केला याकडे आता लक्ष लागले आहे.