सावदा : प्रतिनिधी । लग्नाचा बनाव करून तरुणाला दीड लाखात लुबाडणाऱ्या ७ आरोपींविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या ७ पैकी एका आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे
रावेर तालुक्यातील खिरोदा येथील रहिवाशी मिलिंद इंगळे या ३४ वर्षीय तरुणाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे या ७ आरोपींपैकी टाटानगर गोवंडीची रहिवाशी नाजनीन जान मोहम्मद खान या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे . लालचंद ओंकार म्हसकर ( रा – पिंप्राळा जामठी , ता -सोयगाव , जि – औरंगाबाद ) , विशाल पाटील , नवरीची चुलत बहीण ( नाव माहिती नाही ) , अंकुश खडसे , हर्षल पाटील , लताबाई अशी या आरोपींची नावे असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे . २० जून रोजी या सर्व आरोपींनी फिर्यादीच्या लग्नाचा बनाव करून त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयात लुबाडले आहे अमरावती शहराजवळच्या बडनेरा बायपास मार्गाजवळ हा लग्नाचा बनाव करण्यात आला होता २८ जून रोजी या गुन्ह्याची फिर्याद दाखल करण्यात आली या आरोपींविरोधात भा द वि कलम ४२० , ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो . उ . नि. आर. डी . पवार करीत आहेत .