भुसावळ प्रतिनिधी । येथील ओ ३ गणेशा प्रतिष्ठान भुसावळ समाजसेवी संस्थेमार्फत जि. प. प्राथ. शाळा मानमोडी मधील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सन 2021 22 या शैक्षणिक वर्षात शासन मार्फत मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात आलेली नाहीत विद्यार्थ्यांना वाचन लेखन व गणित किंवा क्रिया याव्यात म्हणून त्री गणेशा प्रतिष्ठान भुसावळ समाजसेवी संस्थेमार्फत जि प प्राथ शाळा मानमोडी येथे विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी दोनशे पेजेस वही व पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच संस्थेमार्फत मानमोडी येथील समशान भूमित (संत तुकाराम महाराज वनौषधी उद्यान) येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी पाईपलाईन टाकून दिलेली आहे. कोरोना निर्मूलनासाठी संस्थेमार्फत गावात प्रत्येक घरी भिलावा या आयुर्वेदिक वनस्पतींचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थाध्यक्ष विद्या बडगुजर, शिक्षक विश्वासराव बडगुजर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगन्नाथ पवार, माधुरी इंगळे, ज्ञानेश्वर पाटील व इतर गावकरी उपस्थित होते.