Home Cities जळगाव शकुंतला विद्यालयात वटसावित्री पौर्णिमानिमित्त वृक्षारोपण

शकुंतला विद्यालयात वटसावित्री पौर्णिमानिमित्त वृक्षारोपण

0
115

जळगाव, प्रतिनिधी  । शकुंतला जे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे वटसावित्री पौर्णिमानिमित्त महिला शिक्षिकानी वृक्षारोपण केले. 

 

शकुंतला जे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वटसावित्रीपौर्णिमानिमित्त शिक्षण विस्तार अधिकारी  किशोर वायकोळे  यांचे प्रमुख उपस्थितीत वडाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले.  याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांनी श्री. वायकोळे यांचे  स्वागत केले. याप्रसंगी  किशोर वायकोळे यांनी वडाचे सध्याच्या कोरोना काळातील महत्व पटवून सांगितले. याप्रसंगी वड व इतर वृक्षांची लागवड महिला शिक्षिकांनी केले. प्रसंगी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नेहा जंगले  धनंजय फिरके ,  योजना चौधरी, प्रतिभा किनगे , हर्षा  इंगळे, स्वाती जंगले, लक्ष्मी भालेराव उपस्थित होत्या.

 


Protected Content

Play sound