यावल प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यावल आवारात बांधण्यात आलेल्या नवीन क्लिनींग ग्रेडींग युनिट व गोडावुन बांधकामाचे लोकार्पण व धान्य चाळण व कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे नामकरण सोहळा उद्या (दि.२५ जुन) रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या भव्य क्लिनिंग ग्रेडींग युनिट व गोडावुन बांधकामाचे लोकापर्ण व नामकरण सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आयोजीत करण्यात आला असुन या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणुन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत सोनवणे, मुख्य अतिथी म्हणुन खा.रक्षाताई खडसे, माजी जलसंपदामंत्री व आमदार गिरीष महाजन, यावल रावेरचे आ.शिरीष चौधरी, आ. लताताई सोनवणे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे ( राजु मामा ) यांच्या उपस्थितीत हा लोकापर्ण व नामकरण सोहळा सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कोवीड१९च्या नियमांचे पालन करीत आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषारसिंग ( उर्फ मुन्नाभाऊ ) सांडुसिंग पाटील, उपसभापती उमेश प्रभाकर पाटील यांच्यासह कृउबाचे सर्वसन्मानिय संचालक मंडळ तसेच सचिव स्वप्नील बी सोनवणे यांनी केले आहे.