Home Cities एरंडोल एरंडोल येथे शिवसेनेतर्फे वर्धापन दिन साजरा

एरंडोल येथे शिवसेनेतर्फे वर्धापन दिन साजरा


एरंडोल, प्रतिनिधी । तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त एरंडोल शिवसेना कार्यालयात भगवा ध्वज पूजन व छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला.

यावेळी भगवा ध्वज पूजन एरंडोल तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी रमेश महाजन यांची एरंडोल तालुका समन्वय समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एरंडोल तालुका शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, एरंडोल तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिवसेना तालुका संघटक राजेंद्र चौधरी, युवा सेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील, शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, युवा सेना शहर प्रमुख अतुल महाजन, शिवसेना शहर संघटक नितीन बिर्ला, शिवसेना उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी, उपतालुकाप्रमुख संजय पाटील, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील मराठे, संजय गांधी निराधार समितीचे आनंदा (छोटू) चौधरी भगत, चिंतामण पाटील, राजू टाकू राजू महाजन, माजी नगरसेवक सुभाष मराठे, माजी नगरसेवक सुनिल चौधरी, शिवसेना विभाग प्रमुख फोटो मराठे, अमोल भावसार, कुणाल पाटील, नितीन बोरसे, मयूर महाजन, कृष्णा ओतारी, पद्माकर मराठे, भुषण भोई, गणेश पाटील, पंकज पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound